▶ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी
▶ लोकशाही व मतदारांच्या अधिकारांच्या संरक्षणाची मागणी
सिल्लोड, (प्रतिनिधी) : वोट चोरीच्या विरोधात सिल्लोड तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणाचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला.
या आंदोलनात सिल्लोड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर अॅड. निलेश काळे व सिल्लोड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आवेस आझाद यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मतदारांच्या मताला लोकशाहीमध्ये सर्वो च्च महत्त्व असून निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम राहण्यासाठी पारदर्शकता आणि निष्पक्षता असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.
या आंदोलनात आवश्यक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल अग्रवाल, जाबेर पठाण, गणेश आरके, अॅड. लिंगायत, मंगेश कळम, कृष्णा जाधव, रविंद्र काळे, हाशम पठाण, अतिफ सय्यद, इब्राहिम, यासेर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक मतदाराच्या मताला समान महत्त्व असून मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले. वोट चोरीच्या मुद्द्यावरून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा प्रश्न उपस्थित करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
















